गुरूपौर्णिमा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:08+5:302021-07-23T04:14:08+5:30
- राजवीर मुकुंद कुलांगे, इयत्ता ५ वी, जिल्हा परिषद शाळा, कोकणगाव, ता. कर्जत ........................ माता-पित्यानंतर जगात दुसरे स्थान गुरूला ...

गुरूपौर्णिमा ...
- राजवीर मुकुंद कुलांगे, इयत्ता ५ वी, जिल्हा परिषद शाळा, कोकणगाव, ता. कर्जत
........................
माता-पित्यानंतर जगात दुसरे स्थान गुरूला दिले जाते. बालकांच्या जीवनाला शिक्षणाने आकार देऊन सुजाण नागरिक बनविण्याचे पवित्र कार्य गुरू करत असतो. काळानुसार शिक्षणपद्धती बदलत गेली; पण गुरू-शिष्याचे नाते अबाधित आहे. कोरोनाच्या संकटाने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यावर मर्यादा आल्या. परंतु, तरीही विविध माध्यमातून ही ज्ञानगंगा अविरत वाहत आहे. कोरोनामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांत काहीसा दुरावा निर्माण झाला असे वाटत असेल; पण भेट झाल्यावर शाळा कधी सुरू होणार, हा प्रश्न गुरू-शिष्यातील अतूट नात्याचे उत्तर देतो. कोरोना जाऊन गुरू-शिष्याच्या या पवित्र नात्याची आणि परंपरेची सांगड ज्ञानमंदिरात पुन्हा फुलून यावी, याचीच दोघेही आतुरतेने वाट पाहत आहेत.
- ऋषिकेश रामभाऊ गाेरे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाळकी, ता. नगर