गुणिजन शिक्षक पुरस्कार सुनील रसाळ यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:59+5:302021-07-22T04:14:59+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील मडकेवाडी जि.प. शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील प्रकाश रसाळ यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे ...

गुणिजन शिक्षक पुरस्कार सुनील रसाळ यांना जाहीर
श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील मडकेवाडी जि.प. शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनील प्रकाश रसाळ यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय गुणिजन शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गुणिजन शिक्षक गौरव महासंमेलनात हा पुरस्कार साहित्यिक व मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान केला जाणार आहे. सुनील रसाळ यांनी मडकेवाडी शाळेत बदलीने आल्यानंतर पालकांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने लोकसहभागातून भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, वृक्षारोपण, आकर्षक प्रवेशद्वार, ई-लर्निंग साहित्य, संपूर्ण शाळेला रंगरंगोटी, दोन एलईडी टीव्ही, डिजिटल साउंड बॉक्स, फर्निचर, सुसज्ज खेळाचे मैदान उपलब्ध करून शाळा परिसर अंतर्बाह्य बोलका केला आहे.