गुंडेगावची भैरवनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:50+5:302021-05-27T04:21:50+5:30
केडगाव : गुंडेगाव येथील भैरवनाथ देवाची यात्रा उद्यापासून सुरू होणार होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करावी लागली ...

गुंडेगावची भैरवनाथ यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
केडगाव : गुंडेगाव येथील भैरवनाथ देवाची यात्रा उद्यापासून सुरू होणार होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करावी लागली आहे.
गुंडेगाव येथे यात्रा उत्सव दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवास गावातील भाविकांची गर्दी असते. बाहेरगावी गेलेले नोकरदार, व्यावसायिक
यात्रोत्सवास हमखास हजेरी लावून ग्रामदैवतेचे मनोभावे दर्शन घेतात. परंतु, यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये सदरील यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या शंभर वर्षात यात्रा रद्द होण्याची ही दुसरी वेळ असल्याने अनेक भाविकांच्या श्रद्धेवर विरजण पडले आहे. यंदा घरातूनच भैरवनाथ देवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सरपंच मंगल संकट, उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा उत्सव कमिटीने केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार धार्मिक विधी पूजा करण्यात येईल, असे मत भैरवनाथ मंदिराचे पुजारी सुनील पवार, उपसरपंच संतोष भापकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, माजी सरपंच संजय कोतकर, सुनील भापकर, सतीश चौधरी, संतोष धावडे, राहुल चौधरी, भाऊसाहेब हराळ, सामाजिक कार्यकर्ते संतोष सकट, माजी उपसरपंच मंगेश हराळ, एकनाथ कासार, गोरख माने, भवानी प्रसाद, चुंबळकर मेजर, श्यामराव कासार, संतोष कोतकर, प्रदीप भापकर, सचिन जाधव, दादासाहेब आगळे, संदीप भापकर, संजय भापकर आदी उपस्थित होते.