गुलाबराव शेळके यांच्या निधनाने पारनेरवर शोककळा
By Admin | Updated: July 27, 2016 12:20 IST2016-07-27T12:20:25+5:302016-07-27T12:20:49+5:30
राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच महानगर बँकेचे संस्थापक सॉलिसिटर गुलाबराव शेळके (वय ७४) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

गुलाबराव शेळके यांच्या निधनाने पारनेरवर शोककळा
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २७ - राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच महानगर बँकेचे संस्थापक सॉलिसिटर गुलाबराव शेळके (वय ७४) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पारनेर तालुक्यावर शोककळा पसरली. त्या घटनेतून तालुका सावरत नाही तोच पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपटराव पवार (वय ६०) यांचे अपघाती निधन झाले.
शेळके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. शरद पवार यांचे ते समर्थक होते. महानगर बँकेची त्यांनी स्थापना केली. मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांत त्यांनी या बँकेचा विस्तार केला. ते पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील रहिवासी होते.
माजी सभापती पवार हे आज सकाळी सुपा येथे दुचाकी वाहनावरुन चालले असताना त्यांना चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्त्यू झाला. एकाच दिवशी दोन नेते गमावल्याने तालुक्यावर शोककळा पसरली.