सुप्यातील वाढत्या लोकसंख्येचा मूलभूत सुविधांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:24+5:302021-09-25T04:21:24+5:30
सुपा : लोकसंख्या, उद्योग व्यवसाय, एमआयडीसी, बाजारपेठ, वाहतूक दळणवळण सुविधा, आर्थिक उलाढाल अशा अनेक बाबींमध्ये पारनेर तालुक्यात नंबर वन ...

सुप्यातील वाढत्या लोकसंख्येचा मूलभूत सुविधांवर ताण
सुपा : लोकसंख्या, उद्योग व्यवसाय, एमआयडीसी, बाजारपेठ, वाहतूक दळणवळण सुविधा, आर्थिक उलाढाल अशा अनेक बाबींमध्ये पारनेर तालुक्यात नंबर वन ठरलेल्या सुपा (ता. पारनेर) शहरामध्ये हळूहळू गैरसोयी डोकेवर काढू लागल्या आहेत. येथील वाढत्या लोकसंख्येमुळे सोयीसुविधांची पूर्तता करताना संबंधित यंत्रणांची दमछाक होत आहे.
या सविधा पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या गाव पुढाऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. गावातील कचरा, पिण्यासाठीचे पाणी, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणापुढील अडचणीत वाढ होत आहे. येथील कागदोपत्री लोकसंख्या ६ हजार १४७ असून शासकीय योजनेद्वारे विकासकामांसाठी ४९ लाख रुपये निधी मिळत असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. एमआयडीसी झपाट्याने वाढत असून त्यात काम करणारे कामगार, अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्याबरोबरच सर्वांच्या विविध गरजा भागविण्यासाठी अनेक दुकाने, व्यवसाय येथे सुरू झाले. त्यामुळे यातील बहुसंख्य मंडळी येथेच वास्तव्यास असली तरी त्यांची जनगणना नाही. येथे वास्तव्य असल्याबद्दल सरकारी दप्तरी नोंदी नाहीत. मात्र यांना सोयीसुविधा तर पुरवाव्याच लागतात. यासाठी लागणारा निधी ना सरकारी योजनेतून प्राप्त होतो ना संबंधित मंडळींकडून. त्यामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रशासन यांना कसरत करावी लागते.
---
निधी मिळतो ४९ लाख..
सध्या १५ व्या वित्त आयोगातून गावच्या विकासासाठी ६ हजार १४७ लोकसंख्या गृहित धरून ४९ लाख रूपयांचा निधी प्राप्त होत असल्याची माहिती सरपंच मनीषा रोकडे व उपसरपंच सागर मैड यांनी दिली.
220921\15134311img_20210828_063456.jpg
सुपा बातमी फोटो