शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

जगतापांसाठी पिचड मैदानात

By admin | Updated: December 15, 2015 23:16 IST

अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दोन तास प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांचा आढावा घेतला.

अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी दोन तास प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांचा आढावा घेतला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार अरुण जगताप यांना विजयी करण्याचा आदेश पिचड यांनी दिला. जगताप यांच्या विजयासाठी थेट पिचड आता प्रचार मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी भवनमध्ये मंगळवारी दुपारी पिचड आले होते. यावेळी उमेदवार अरुण जगताप, जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती शरद नवले, माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सिध्दार्थ मुरकुटे, सुजीत झावरे, कैलास वाकचौरे, सुनील गडाख, सचिन जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पिचड यांनी उपस्थितीत सदस्यांकडून तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सदस्यबळ ३२ असून ४ ठिकाणी सभापतीपद ताब्यात आहे. राष्ट्रवादीच्या ३६ संख्याबळातून काही सदस्य विधानसभा निवडणुकीत बाजूला गेलेले आहे. हे सदस्य सोडून उर्वरित सर्व सदस्यांनी एकत्र रहावे. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीतील मते कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाहीत. सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहवे, असा सल्ला पिचड यांनी दिली. साधारण दोन तास चाललेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत जगताप यांना निवडून आणण्याचे आदेश त्यांनी दिले. (प्रतिनिधी) दरम्यान, निवडणुकीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये गोंधळ आहे.‘लोकमत’शी बोलताना अनेक सदस्यांनी ससाणे माघारी फिरतात की बंडखोरी करतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. पक्षाकडून सदस्यांना अद्याप कोणत्याच सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. शशिकांत गाडेंचा मतदारांशी संवाद विधान परिषदेचे शिवसेना-भाजपाचे उमेदवार शशिकांत गाडे मंगळवारी उत्तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, प्राजक्त तनपुरे, भाजपाचे माजी आ. चंद्रशेखर कदम त्यांच्या सोबत होते. गाडे यांनी लग्न समारंभाचे निमित्त साधत उत्तरेतील मतदारांशी संवाद साधला. यावेळी पक्षातील पदाधिकारी यांच्या मदतीसाठी सरसावले होते.