किराणा दुकान फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:31+5:302020-12-05T04:38:31+5:30
नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात किरण राजेंद्र भोर यांचे मायमार्ट सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. ...

किराणा दुकान फोडले; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात किरण राजेंद्र भोर यांचे मायमार्ट सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. त्यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि ते आपल्या घरी निघून गेले. त्यानंतर चोरीची ही घटना बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी ही संधी साधून दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून दुकानात शिरून चोरट्यांनी ४५ हजार ७२० रुपयांची रोख रक्कम यासह किराणा माल, संगणक, लॅपटॉप, टीव्ही आदी साहित्यासह एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे किरण भोर आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे करीत आहेत.