तळेगाव विद्यालय सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST2021-01-08T05:03:35+5:302021-01-08T05:03:35+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ...

Greetings to Talegaon Vidyalaya Savitribai Phule | तळेगाव विद्यालय सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

तळेगाव विद्यालय सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

तळेगाव दिघे विद्यालयात आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास सरपंच बाबासाहेब कांदळकर, डॉ. सोमनाथ जोंधळे, प्राचार्य एच. आर. दिघे, संजय दिघे, रामदास दिघे, चंद्रभान हापसे, शिवाजी दिघे, राधाकिसन दिघे, भीमराज फटांगरे, संजय आर. दिघे, राम गायकवाड, महेश उगार, तुकाराम सोळसे, मच्छिंद्र सोनवणे, सुनील थेटे, आण्णासाहेब कोटकर, शालन उगले, शोभा गुंजाळ, प्रमिला घायतडकर, शीतल कडलग, आशा पन्हाळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. सी. दिघे यांनी केले. मच्छिंद्र सोनवणे यांनी आभार मानले.

....

फोटो : ०४ तळेगाव फुले जयंती

...

ओळी-तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना सरपंच बाबासाहेब कांदळकर, डॉ. सोमनाथ जोंधळे, समवेत शिक्षकवृंद.

Web Title: Greetings to Talegaon Vidyalaya Savitribai Phule