चिचोंडीत संत सेना महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:20+5:302021-09-05T04:25:20+5:30
बारा बलुतेदार महासंघाचे नूतननगर तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव व तालुका सरचिटणीस दीपक कांबळे यांची निवड झाल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने सत्कार ...

चिचोंडीत संत सेना महाराजांना अभिवादन
बारा बलुतेदार महासंघाचे नूतननगर तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव व तालुका सरचिटणीस दीपक कांबळे यांची निवड झाल्याबद्दल नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी चिचोंडी पाटील नाभिक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संतोष जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी महादेव जाधव तर सचिव व समाज संपर्कप्रमुख म्हणून संदीप जाधव यांची निवड करण्यात आली. या वेळी माणिक जाधव, बलभीम जाधव, शहाजी जाधव, संभाजी जाधव, बापूराव जाधव, महादेव जाधव, अशोक जाधव, सुभाष जाधव, संतोष जाधव, अक्षय काळे, रमेश पंडित, मनोज जाधव, संदीप जाधव, उमेश जाधव, दर्शन जाधव उपस्थित होते. श्रावणी जाधव व सई जाधव यांनी मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढली. सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.