कोपरगावात रविदास महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST2020-12-23T04:17:10+5:302020-12-23T04:17:10+5:30

कोपरगाव : श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्यावतीने श्री ...

Greetings to Ravidas Maharaj in Kopargaon | कोपरगावात रविदास महाराजांना अभिवादन

कोपरगावात रविदास महाराजांना अभिवादन

कोपरगाव : श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघांच्यावतीने श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज समाज मंदीर येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांना सोमवारी ( दि.२१ ) अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब कानडे, नाशिक विभाग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, सदस्य स्नेहाताई कानडे, उप तालुकाध्यक्ष संजय सरवार, शहराध्यक्ष गणेश कानडे, तालुका कार्याध्यक्ष ऍड. रमेश दुशिंग, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, तालुका संघटक संजय दुशिंग, संतोष कानडे, सागर पोटे, राकेश धाकतोडे, सुनंदा कानडे, सरस्वती कानडे, संदेश कानडे, गणेश शिंदे, माऊली टेलर, भैया कानडे, संजना सातपुते, शिवानी कानडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Greetings to Ravidas Maharaj in Kopargaon