कोरोनाचे नियम पाळत छत्रपतींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:40+5:302021-04-01T04:21:40+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने सार्वजनिकरित्या उत्सव, जयंती साजरी करण्यास मनाई केली आहे. नागरिकांनीही गर्दी न करता जयंती साजरी ...

Greetings to Chhatrapati following the rules of Corona | कोरोनाचे नियम पाळत छत्रपतींना अभिवादन

कोरोनाचे नियम पाळत छत्रपतींना अभिवादन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने सार्वजनिकरित्या उत्सव, जयंती साजरी करण्यास मनाई केली आहे. नागरिकांनीही

गर्दी न करता जयंती साजरी केली. बहुतांशी जणांनी घरीच जयंती साजरी केली. शहरातील चौपाटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आमदार संग्राम जगताप यांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, निखिल गहिले, गजेंद्र दांगट, शिवा अनभुले, भाऊ वाकळे, महेश बागले, महेश वाकचौरे आदी उपस्थित होते.

हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने चितळे रोड येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय झिंजे, घनश्याम बोडखे, मिलिंद मोबारकर, वसंत लोढा, सागर ढुमणे, निखिल धंगेकर, महेश निकम, केशव मोकाटे, सूरज गोंधळी आदी उपस्थित होते.

नागापूर, बोल्हेगाव येथील जय भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाश कातोरे मित्रमंडळाच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा नेते आकाश कातोरे, विकी राऊत, विशाल वाकचौरे, संजय बोठे, कौस्तुभ राऊत, महेश येणारे, निलेश बेंद्रे, सुहास पवार, विष्णू झेंडे, लियाकत पठाण, साईनाथ आमले, संदीप गांगर्डे, बाबुराव आघाव, किशोर कोलते, भाग्येश आंधळे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Chhatrapati following the rules of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.