महेश मुनोत विद्यालयात बाबूशेठ मुथा यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST2021-02-23T04:31:09+5:302021-02-23T04:31:09+5:30

राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथील अ. ए. सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी, सामाजिक ...

Greetings to Babusheth Mutha at Mahesh Munot Vidyalaya | महेश मुनोत विद्यालयात बाबूशेठ मुथा यांना अभिवादन

महेश मुनोत विद्यालयात बाबूशेठ मुथा यांना अभिवादन

राहुरी : तालुक्यातील वांबोरी येथील अ. ए. सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी, सामाजिक उद्गाते कै. बाबुशेठ मुथा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अजयकुमार बारगळ तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. एम. झंवर उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक नागदे यांनी केले. मुथा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या रुग्णसेवेची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल डॉ. व्ही. एम. झंवर यांचा प्रशालेचे उपाध्यक्ष हेमंत मुथा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भीमराज आव्हाड, गौतम मुथा, सुरेश मुथा, अक्षय मुथा, बबलू मुथा, पोपट मुथा, महावीर मुथा, उदय मुथा, संभाजी पवार, प्रा. संजय तमनर, अनिल लोहकरे, शिवाजी मंडलिक, बाबासाहेब पटारे, अस्लम शेख, मनिषा कसोटे, ज्योती साळवे, रेखा आघाव, शोभा सुडके, जोत्स्ना तोडमल, संगीता कोळी, शुभांगिनी भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Babusheth Mutha at Mahesh Munot Vidyalaya