सतीश पाटील, बाळासाहेब लबडे यांना ग्रंथ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:24 IST2021-03-01T04:24:43+5:302021-03-01T04:24:43+5:30
जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०१९ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील, प्रा. ...

सतीश पाटील, बाळासाहेब लबडे यांना ग्रंथ पुरस्कार
जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०१९ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये डॉ. सतीश पाटील, प्रा. बाळासाहेब लबडे आदींचा समावेश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लेखक प्रा. पवार यांनी दिली.
काव्यसंग्रह, कथा, कादंबरी, लेखसंग्रहाचे ग्रंथ पुरस्कार राजे संभाजी साहित्य पुरस्कार आणि समीक्षा व बालसाहित्याचे महात्मा फुले साहित्य पुरस्कार या नावाने पुरस्कार दिले जातात. रोख रक्कम, मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनात पुरस्कारांचे वितरण होईल, असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी सांगितले.
जाहीर झालेले पुरस्कार असे- राजे संभाजी साहित्य पुरस्कार डॉ. सतीश पाटील, कोल्हापूर (मृत्युस्पर्श), प्रा. बाळासाहेब लबडे, रत्नागिरी (पिपिलिका मुक्तिधाम),
काव्यसंग्रह प्रा. साईनाथ पाचारणे, पुणे (माझ्या वाट्याची लोकशाही), विशाल इंगोले, बुलडाणा (माझ्या हयातीचा दाखला), काव्यसंग्रह प्रा. अनंता सूर, यवतमाळ (वाताहत), लेखसंग्रह- अॅड. राम हरपाळे, औरंगाबाद (आनंदी जीवनाच्या वाटा), रवींद्र जवादे, अकोले (गायी गेल्या राना). महात्मा फुले साहित्य पुरस्कार : समीक्षा/संशोधन ग्रंथास डॉ. गणेश चव्हाण, नागपूर (अमृत विचार मंथन), डॉ. अरुण शिंदे, कोल्हापूर (सत्यशोधकीय नियतकालिके). बालसाहित्य- डॉ. मंजूषा कुलकर्णी, मुंबई (अणू विज्ञानातील झंझावात डॉ. अनिल काकोडकर).
ग्रंथ निवड समितीत प्रा. डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. दत्तात्रय फलके, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी काम पाहिले.