चिचोंडीला तीर्थक्षेत्र दर्जा द्या
By Admin | Updated: June 26, 2014 00:43 IST2014-06-25T23:42:22+5:302014-06-26T00:43:22+5:30
अहमदनगर : राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांचे जन्मस्थान चिचोंडीला (ता.पाथर्डी) तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री
चिचोंडीला तीर्थक्षेत्र दर्जा द्या
अहमदनगर : राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांचे जन्मस्थान चिचोंडीला (ता.पाथर्डी) तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.
आ.गडाख यांनी पवार यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी यावर सकारात्मक भूमिका घेऊन पाटील यांच्याशी चर्चा केली. त्याबाबतची माहिती घेतली. शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र जाहीर करताना शासनाने काही अटी घातल्या आहेत. परंतु याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ. जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागवून या जन्मस्थळास तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊ, असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे, अशोक चौधरी, अतुल बोकरिया, जैन काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य वैभव नहार, महावीर नहार, सागर गांधी, बालचंद खरवड, भवर बोरा, किशोर भंडारी, अश्विन फिरोदिया, राजेंद्र गांधी, सुनील बोरा, राहुल मुथा, अजित गुगळे, अजय नहार, वैभव नहार, स्वप्नील मुनोत हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आनंदऋषीजींचे महात्म्य
राष्ट्रसंत आनंदऋषीजी यांनी वयाच्या तेराव्या वर्षी जैन धर्माची दीक्षा घेऊन भारतभर पायी भ्रमण करत जैन धर्माचा प्रचार व प्रसार केला. सर्व जातीधर्मातील लोकांना समता, बंधुता, अहिंसेची शिकवण दिली. त्यांना महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत ही पदवी प्रदान केली़ ते जैन धर्माचे आचार्य आहेत. दरवर्षी त्यांच्या जन्मजयंती निमित्त जैन बांधव चिचोंडी येथे भेट देतात.