शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

 दादा.. तुम्ही सांगूनही काम अधुरेच; पहिल्याच पावसात दुकानांमध्ये घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 13:19 IST

खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.

अहमदनगर : विखे कुटुंबाची कामाची पध्दत जिल्ह्याला माहिती आहे. एकदा सांगितले म्हणजे काम फत्ते, अशी विखे पिता-पुत्रांची ओळख़. काम केलं नाही, तर मी तुमच्या घरी येऊन बसेन, असे खासदार डॉ.सुजय विखे यांनी ठेकेदाराला दरडावून सांगितले होते. मात्र तरही यंत्रणा जागची हाललीच नाही. अखेर पहिल्याच पावसात गुरुवारी निलक्रांती चौकातील दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे दादा.. तुम्ही सांगून पण, काम अधुरेच.. असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबाबत खासदार डॉ़. सुजय विखे यांनी महापालिकेत बैठक घेतली़. हे काम सुरू का होत नाही? काय अडचणी आहेत? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराला चांगलेच सुनावले. ठेकेदाराला तर काम पूर्ण केले नाही तर तुमच्या घरी येऊन बसेन, अशी धमकी दिली. ठेकेदारानेही मान डोलावत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनीही आदेश काढला. कामाची पाहणी केली़. पण वर्षे उलटूनही गटारीचे काम ठेकेदारे पूर्ण केलीच नाही़. गुरुवारी सायंकाळी नगर शहरात अवकाळी पाऊस झाला. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी आले. या मार्गावरील दुकानांमध्ये पाणी घुसले. नगर शरातून विखे यांना सर्वाधिक मते मिळाली़. त्यामुळे विखे यांनी नगर शहरावर लक्ष केंद्रीत केले. बैठकांचा धडाका लावला़ उडाणपुलासह शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. विळदघाटात शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांबाबत नाशिक येथील अधिका-यांना बोलावून समन्वय बैठक घेतली़. या बैठकीत सर्व अडचणी दूर झाल्याने अधिकारीही कामाला लागले. पण, पुढे या कामांचे काय झाले? याचा जाब यंत्रणेला कुणी विचारलेला दिसत नाही़. त्यामुळे बैठका होऊनही दिल्लीगेटचे काम जैसे थै आहे.  खासदार विखे यांनी लक्ष घालूनही हे काम पूर्ण न झाल्याने हा शहरातील सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसWaterपाणीShoppingखरेदीroad safetyरस्ते सुरक्षा