बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी, नातीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:46+5:302021-05-03T04:15:46+5:30

चिंचोलीगुरव येथील प्रमिला श्रीराम आभाळे ( वय ४७ वर्षे ) या नात भक्ती नीलेश आभाळे ( वय ७ वर्षे ...

Grandmother, granddaughter drowned in the dam | बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी, नातीचा मृत्यू

बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी, नातीचा मृत्यू

चिंचोलीगुरव येथील प्रमिला श्रीराम आभाळे ( वय ४७ वर्षे ) या नात भक्ती नीलेश आभाळे ( वय ७ वर्षे ) हिला सोबत घेऊन दुपारच्या सुमारास जाधव वस्ती परिसरात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सदर परिसरात असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यातील डबक्यात भक्ती आभाळे ही पडली असता, आजी प्रमिला आभाळे या नातीस वाचविण्याचा प्रयत्न करताना पाण्यात बुडाल्या. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नजीकच्या शेतात सदर जनावरे गेली. मात्र, जनावरांमागे कुणीच नसल्याने एका युवकाने बंधाऱ्याजवळ जाऊन पाहणी केली असता, हा प्रकार उघड झाला. या घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

.............

फोटो : Pramila Aabhale फोटो : Bhakti Aabhale

Web Title: Grandmother, granddaughter drowned in the dam