राज्यातील ग्रामसेवकांचे आजपासून काम बंद
By Admin | Updated: July 1, 2014 00:17 IST2014-06-30T23:35:05+5:302014-07-01T00:17:24+5:30
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मंगळवार (दि.१) पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.
राज्यातील ग्रामसेवकांचे आजपासून काम बंद
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मंगळवार (दि.१) पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली. सोमवारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले की, मंगळवार पासून सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या चाव्या पंचायत समितीकडे देणार आहेत. ग्रामसेवक अनेक दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत असून त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांना सुधारित ९,३०० ते ३४, ८०० करण्यात यावी, नरेगासाठी गावपातळीवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असावी, २० ग्रामपंचायतीसाठी एक विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवकांचा कंत्राटी कार्यकाळ निश्चित करण्यात यावा, आदर्श ग्रामसेवक सोहळा राज्यस्तरावर लागू व्हावा आणि त्यांना वेतन वाढ, फरक द्यावा, नरेगा एकतर्फी चौकशी वसूली व कार्यवाही त्वरीत थांबविण्यात यावी, बदली बाबत धोरण निश्चित करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात सुनील लांडगे, एम.के .दहिफळे, परमेश्वर सुद्रिक, विजय बनाते, वृषाली नवले, गोवर्धन रांधवण, संजय घुगे यांच्यासह अन्य ग्रामसेवक सहभागी झाले.