कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी करणार संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:28+5:302021-02-05T06:39:28+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अॅड.कॉ. ...

कृती समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी करणार संघर्ष
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे (आयटक) तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अॅड.कॉ. सुभाष लांडे, भारती न्यालपेल्ली, अंबादास दौंड, कॉ.मारुती सावंत, कॉ.संजय डमाळ, एकनाथ वखरे, अशोक वाघमारे, बबन पाटील, अमृत महाजन, सुरेश निकाळजे, शरद खोडदे, शिंदे, सतीश पवार, बाळासाहेब लोखंडे, अनिल शिंदे, अनीस बागवान आदिंसह अहमदनगर, बीड, नागपूर, पुणे, वाशिम, रायगड, नाशिक, बीड, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्यांतील विविध ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चव्हाण, सरचिटणीसपदी धनराज पाटील, कार्याध्यक्षपदी सुभाष तुळवे, उपाध्यक्षपदी विनोद देशमुख, मिलिंद गणविरे, सहसचिवपदी सखाराम दुरुगुडे, मंगेश म्हात्रे, श्रीकांत डापसे, खजिनदारपदी ए.बी. कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुखपदी विजय सरोवर, सदस्यपदी तानाजी ठोंबरे, राजेंद्र व्हावळ, राहुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, राहणीमान भत्ता, यावलकर समितीच्या शिफारशी, पेन्शन, ग्रॅज्युटी रक्कम आदी प्रश्नावर एकसंघटितपणे आंदोलन केले जाणार आहे.