शासनाने करमाफी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:53+5:302021-04-02T04:21:53+5:30

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सुजीत गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, रवींद्र कोते, ...

The government should give tax exemption | शासनाने करमाफी द्यावी

शासनाने करमाफी द्यावी

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्‍याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सुजीत गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, रवींद्र कोते, अशोक गायके, अभिजीत संकलेचा उपस्थित होते.

कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्‍या प्रतिबंधात्‍मक तरतुदीमुळे मागील अनेक दिवस साईबाबांचे मंदिर बंद होते. त्‍यामुळे भाविकही येऊ शकले नाहीत. त्‍यामुळे या तीर्थक्षेत्राच्‍या ठिकाणी असलेले सर्व व्‍यवसायांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शिर्डी शहरातील अर्थव्‍यवस्‍था ही संपूर्णपणे येणाऱ्या साईभक्‍तांवर अवलंबून आहे. अनेक दिवसांनंतर मंदिर उघडले असले तरी, भाविकांची संख्‍या अत्‍यंत कमी आहे. याचा फटका शहरातील छोटे-मोठे व्‍यावसायिक, हॉटेलचालक यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्‍यामुळे नगरपंचायतीने दिलेली कराची बिलेही भरणे मुश्‍कील आहे. आर्थिक वर्षाखेरीस करांच्‍या वसुलीवरही मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने सर्व कर व भाडे वसुलीस माफी द्यावी, अशाप्रकारचा ठराव २४ ऑगस्‍ट २०२० रोजी नगरपंचायतीच्‍या सर्वसाधारण सभेमध्‍ये करून शासनाकडे पाठविण्‍यात आला आहे. या ठरावाचा तसेच व्‍यापारी, नागरिक, हॉटेलचालक यांच्‍या मागणीचा सहानुभूतीने विचार करून, शासनाने तातडीने करमाफी देण्‍याबाबत विचार करावा आणि मागणी केली आहे. नगरपंचायतीच्‍या वतीने नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर यांनी मागण्‍यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले.

Web Title: The government should give tax exemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.