सरकारी दवाखाने बनले टोलनाके
By Admin | Updated: July 8, 2016 23:31 IST2016-07-08T23:17:33+5:302016-07-08T23:31:25+5:30
अहमदनगर : सरकारच्या १०८ रुग्णवाहिकेतून येणारे रुग्ण सरकारी रुग्णालयांत केवळ नोंदणी करतात आणि पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जातात,

सरकारी दवाखाने बनले टोलनाके
अहमदनगर : सरकारच्या १०८ रुग्णवाहिकेतून येणारे रुग्ण सरकारी रुग्णालयांत केवळ नोंदणी करतात आणि पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जातात, असे सांगून सरकारी रुग्णालयांची स्थिती टोलनाक्यांसारखी झाली असल्याची खंत खासदार दिलीप गांधी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली़
खासदार गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात सनियंत्रण व दक्षता समितीची सभा पार पडली़ त्यावेळी ते बोलत होते़ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, डॉ़ अजित फुंदे, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता व्हि़जी़ सोनटक्के आदी सभेला उपस्थित होते़ केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याबाबत गांधी यांनी नाराजी व्यक्त केली़ जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकेच्या लाभार्थींच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवर आक्षेप घेत दोन टक्केदेखील रुग्ण सरकारी दवाखान्यात उपचार घेत नाहीत, असा दावा गांधी यांनी केला़ या रुग्णवाहिकेतून आलेले किती रुग्ण बरे होऊन आपल्याकडे आले ? असा सवाल उपस्थित करत जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.