देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:20+5:302020-12-13T04:36:20+5:30
नेवासा : देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार आहोत, अशी माहिती अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे ...

देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा उभारणार
नेवासा : देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार आहोत, अशी माहिती अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे महासचिव चंपतराय यांनी दिली.
चंपतराय यांनी कार्तिक वद्य एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. किसनगिरी बाबांची तपोभूमी, देवगडची गोशाळा, भक्तनिवास याविषयी भास्करगिरी महाराजांनी त्यांना माहिती दिली. प्रवरा नदीच्या तीरावर त्यांनी पाहणी केली.
राम मंदिर निर्माणकार्यात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर निर्माण व्यापक निधी अभियान राबविण्यात येणार असल्याचे चंपतराय यांनी सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आप्पा बारगजे यांनी श्रीराम मंदिर न्यासासाठी २१ लाखांची देणगी देण्याची घोषणा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुनील चावरे, सरपंच अजय साबळे, महेंद्र फलटणे, विश्वनाथ नाणेकर, संतोष काळे उपस्थित होते.