साळवणदेवी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कोथिंबिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:34+5:302021-03-06T04:20:34+5:30

श्रीगोंदा : शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माता साळवणदेवी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भाजप नेते बापूसाहेब गोरे यांनी तर ...

Gore as the president of Salvandevi and Kothimbire as the vice president | साळवणदेवी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कोथिंबिरे

साळवणदेवी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरे तर उपाध्यक्षपदी कोथिंबिरे

श्रीगोंदा : शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माता साळवणदेवी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भाजप नेते बापूसाहेब गोरे यांनी तर उपाध्यक्षपदी दादासाहेब कोथिंबिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये सर्व संचालकांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून आर. आर. चाबुकस्वार व सहाय्यक सुभाष निकम यांनी काम पाहिले. यामध्ये संस्थेचे संस्थापक गोरे यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. दादासाहेब कोथिंबिरे यांना सलग दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची सर्वानुमते संधी देण्यात आली. संचालक म्हणून अशोक खेंडके, बाळासाहेब पुराणे, छबू शेळके, माशीबी महंमद मालजप्ते, रतन शेलार यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, अण्णा शेलार, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, नानासाहेब कोथिंबिरे आदींनी निवडीचे स्वागत केले.

---

०५ बापूसाहेब गोरे, ०५ दादासाहेब कोथिंबिरे

Web Title: Gore as the president of Salvandevi and Kothimbire as the vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.