गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका
By शेखर पानसरे | Updated: July 10, 2023 13:57 IST2023-07-10T13:56:54+5:302023-07-10T13:57:08+5:30
महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

गोपीनाथराव मुंडे यांचे कुटुंबही या लोकांनी फोडले; छगन भुजबळ यांची टीका
संगमनेर : भारतीय जनता पक्षाचे एक कुटुंब आहे, गोपीनाथराव मुंडे यांचे, ते कुटुंब पण या लोकांनी फोडले होते. धनंजय मुंडे यांना गोपीनाथराव मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापासून दूर करणारे तुम्हीच होते. अशी टीका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
सोमवारी ( दि.१०) कॅबिनेट मंत्री भुजबळ हे नशिकहून पुणे येथे जात असताना त्यांचे संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच भाजपने पवार कुटुंब फोडले, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. याबाबत पत्रकारांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, नाशिकला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तेथून आम्हाला सामाजिक कामाची ऊर्जा मिळते. ते आणखी एक स्थान आहे, पुण्यातील फुले वाडा. तेथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे घर. येथून त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिलांचे शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी हाल, अपेष्टा सोसून काम केले तेथे मस्तक टेकण्यासाठी जातो आहे.