गणेश रणदिवे यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:21+5:302020-12-16T04:36:21+5:30
धुळे जिल्ह्यात काम करताना सहायक वनसंरक्षक रणदिवे यांनी सुमारे १०० हून अधिक अवैध वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, पिकअप ...

गणेश रणदिवे यांना सुवर्णपदक
धुळे जिल्ह्यात काम करताना सहायक वनसंरक्षक रणदिवे यांनी सुमारे १०० हून अधिक अवैध वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, पिकअप व उत्खनन करणारे ट्रॅक्टर व इतर वाहने जप्त करत अनेक वाहने सरकार जमा केली.
अवैध तस्करी करणाऱ्या ठिकाणी सुमारे चाळीसहून अधिक ठिकाणी छापा टाकून खैर, चंदन, साग, शिसम इत्यादी मौल्यवान प्रजाती जप्त करून शासनास सुमारे करोडो रुपयांचा महसूल जमा करून दिला. वनालगत असलेल्या सर्व गावांमध्ये एलपीजी गॅस वाटप व इतर शासनाच्या प्रभावी योजना अंमलबजावणी केली. मांडूळ तस्करी, वन्यजीवांची कातडी तस्करी, पक्ष्यांची तस्करी घोरपड तस्करी आदी प्रकरणी सात आरोपींसह गुन्हे उघडकीस आणले. या कामगिरीची दखल घेत वनविभागाने त्यांना सुवर्णपदक जाहीर केले.
वन्यजीव विभाग नाशिकचे वन संरक्षक अनिल करंजकर, सहायक वन संरक्षक भरत शिंदे, वनक्षेत्रपाल अमोल आडे, डी. डी. पडवळे यांनी रणदिवे यांचे कौतुक केले आहे.