किराणा आणायला गेलेल्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 13:46 IST2020-05-08T13:45:24+5:302020-05-08T13:46:03+5:30

किराणा आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातातील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  ६ मे रोजी सायंकाळी राहुरी शहरात घडली. 

The gold bracelets of the woman who went to fetch groceries were taken away by the thieves | किराणा आणायला गेलेल्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लांबविल्या

किराणा आणायला गेलेल्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लांबविल्या

राहुरी : किराणा आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातातील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना  ६ मे रोजी सायंकाळी राहुरी शहरात घडली. 
 राहुरी शहरातील मंजुळा निवास, करपे इस्टेट येथे रहिवासी असलेल्या शोभा झुंबरलाल थोरात (वय ५५) या ६ मे रोजी सायंकाळी आठ वाजेदरम्यान दुकानात किराणा सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी सदर महिलेच्या दोन्ही हातात चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या होत्या. सामान खरेदी करीत असताना काही अनोळखी चोरट्यांनी या बांगड्या लांबविल्या. घरी गेल्यानंतर बांगड्या गायब झाल्याचे लक्षात आले. राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या घटनेबाबत शोभा झुंबरलाल थोरात या महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The gold bracelets of the woman who went to fetch groceries were taken away by the thieves