गोदावरीत 1 लाख 50 हजार क्युसेकचा विसर्ग : कोपरगाव शहरातील पुलावरून वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:13 IST2019-08-04T14:08:40+5:302019-08-04T14:13:03+5:30
नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असल्याने गोदावरी नदीत आज 2 वाजता 1 लाख 20क्युसेक इतका विसर्ग होता.

गोदावरीत 1 लाख 50 हजार क्युसेकचा विसर्ग : कोपरगाव शहरातील पुलावरून वाहतूक बंद
कोपरगाव : नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असल्याने गोदावरी नदीत आज सकाळी १० वाजता १ लाख क्युसेक इतका विसर्ग होता. दुपारी 2 वाजता गोदावरीत 1 लाख 50 हजार क्युसेक इतका विसर्ग झाल्याने कोपरगाव तालुक्यात नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे .
दारणातून ३९ हजार क्युसेक, गंगापूर ४५ हजार क्युसेक, कडवा १५ हजार क्युसेक, वालदेवी २१००, पालखेड ४९ हजार ८०० क्युसेक, आळंदी २७०० क्युसेकने सध्या नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरुच राहिल्यास संध्याकाळपर्यंत हाच विसर्ग दीड ते दोन लाख क्युसेक पर्यत जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेआहे. दरम्यान कोपरगाव शहरातील गोदावरी पुलास पाणी लागल्याने नदीकाठी राहणा-या ग्रामस्थ- नागरिकांना हलविण्यास सुरुवात झाली आहे.