दर्शन देरे भगवंता!

By Admin | Updated: June 21, 2014 00:46 IST2014-06-20T23:32:06+5:302014-06-21T00:46:31+5:30

श्रीरामपूर : दर्शन दे रे.., दे रे भगवंता..चा गजर करीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे शुक्रवारी दुपारी आगमन झाले.

God darshan! | दर्शन देरे भगवंता!

दर्शन देरे भगवंता!

श्रीरामपूर : दर्शन दे रे.., दे रे भगवंता..चा गजर करीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे शुक्रवारी दुपारी आगमन झाले. पालखीमुळे अवघी श्रीरामपूरनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.
हाती भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जवळ करीत श्रीरामपूरहून मुक्कामासाठी बेलापूरकडे मार्गस्थ झाले. संगमनेर नाक्याजवळ नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, प्रांताधिकारी प्रकाश थविल, तहसीलदार किशोर कदम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय कोठारी, माजी अध्यक्ष रमेश कोठारी, हमाल मापाडी संघाचे हरिभाऊ आजगे, नगरसेविका राजश्री सोनवणे, मंगला तोरणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष करण ससाणे ँ व मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतले. आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाजार समिती सभापती दीपक पटारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी श्रीराम चौकात स्वागत केले.
बाजरीची भाकरीे अन् बेसन
नॉर्दन ब्रँच येथे हनुमान मंदिर सप्ताह समितीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष सुनील बोलके, सुनील मोरगे आदींच्या पुढाकाराने वारकऱ्यांना बाजरीची भाकर, बेसन खाऊ घालण्यात आले. ठिकठिकाणी संस्था, मंडळांतर्फे केळी, लाडू, चिवडा आदी खाद्य पदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले. पाण्याचे पाऊच व बाटल्यांचेही वाटप करण्यात आले.
भंडारा कार्यक्रम
व्यापारी बाजार समिती व शेतकऱ्यांतर्फेही भंडारा देण्यात आला. राम मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद घेण्यासाठी मोकळी जागा नसल्याने पालखी मेनरोडवर ठेवून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्याची सूचना वारकऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
श्रीरामपूर भक्तिमय
श्रीरामपूरकरांनी आनंदात, भजनाच्या तालात टाळ मृदंगाच्या गजरात बेलापूर नाक्यापर्यंत पालखीला पोहचविले. तेथून दिंडी बेलापूर मुक्कामी रवाना झाली. सोमवारीपासून दिंडीसोबत पाण्याचा एक टँकर देण्याचे आश्वासन आ. कांबळे व जयंत ससाणे यांनी दिले. पालखीमुळे श्रीरामपूर भक्तिमय झाले होते.

Web Title: God darshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.