मनपाच्या मदतीला कर्मचारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST2021-04-13T04:20:47+5:302021-04-13T04:20:47+5:30
--------------- बडी साजन मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू अहमदनगर : येथील बडी साजन मंगल कार्यालयात श्रीबडी साजन ओस्तवाल व ...

मनपाच्या मदतीला कर्मचारी द्या
---------------
बडी साजन मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू
अहमदनगर : येथील बडी साजन मंगल कार्यालयात श्रीबडी साजन ओस्तवाल व श्रीसंघ मंगल कार्यालय यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुमितलाल कोठारी, सचिव विशाल शेटिया, खजिनदार मिलिंद जांगडा, आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते.
----------------------
लसी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
अहमदनगर : राज्यातील नागरिकांसाठी कोरोनावरील लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय कुलट, प्रवीण गीते, जाहीद शेख, वीरेंद्र ठोंबरे, आदित्य यादव आदींचा सहभाग होता.
...
फिनिक्सतफे मोफत नेत्र तपासणी
अहमदनगर: महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गरजूंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.भारतकुमार कोठुळे आदी उपस्थित होते.