दुधाला योग्य भाव, वंचितांना रेशनचे धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:21+5:302021-07-02T04:15:21+5:30

नेवासा : सध्या दुधाचे भाव कोणतेही संयुक्तिक कारण नसताना कमी केले. ते पुन्हा वाढवून द्यावेत. जून २०१९ पासून नवीन ...

Give the right price for milk, ration grains to the deprived | दुधाला योग्य भाव, वंचितांना रेशनचे धान्य द्या

दुधाला योग्य भाव, वंचितांना रेशनचे धान्य द्या

नेवासा : सध्या दुधाचे भाव कोणतेही संयुक्तिक कारण नसताना कमी केले. ते पुन्हा वाढवून द्यावेत. जून २०१९ पासून नवीन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देण्यात येणारे गहू, तांदूळ तातडीने द्यावेत, अशा मागणीचे निवेदन नेवासा तालुका भारतीय जनसंसदने तहसीलदारांना दिले. मागील एक महिन्यात दुधाचे भाव जवळपास १० ते १२ रुपये प्रतिलीटरने कमी झाले आहेत. राज्यात अतिरिक्त दूध नसताना तसेच दुधाची मागणी घटली नसताना संकलन व वितरण करणाऱ्या कंपन्यांनी मनमानीपणे दुधाचे भाव कमी केले. कोरोनामुळे मोलमजुरी करणारे, किरकोळ उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. त्यांना रेशनचे धान्य मिळावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर रामराव भदगले, कारभारी गरड, डॉ. अशोक ढगे, करणासिंह घुले, एस. आर. चव्हाण, दौलतराव शिंदे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Give the right price for milk, ration grains to the deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.