शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो

By admin | Updated: October 11, 2014 00:10 IST

पाथर्डी : बदल घडवायचा नसेल तर असेच रहा असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत़

पाथर्डी : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजपा केवळ स्वार्थासाठी भांडत असून, त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही़ या स्वार्थातूनच त्यांनी युती आणि आघाडी तोडली़ असे सांगत माझ्या हातात सत्ता द्या तुम्ही जो ठरवाल तो दर तुमच्या शेतमालाला देईन,असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले़ तसेच बदल घडवायचा नसेल तर असेच रहा असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत़ शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देविदास खेडकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शहरातील वीर सावरकर मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी देविदास खेडकर, नेवासा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप मोटे, पारनेरचे मोहन रांधवण, बीडचे सुनील धांडे, माजी आ. जयप्रकाश बावीस्कर, राज्य उपाध्यक्ष गणेश महाले, कैलास गिरवले,गणेश भोसलेआदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले की,देशाला स्वातंत्र मिळून ६७ वर्षे झाली मात्र, आजही तेच ते प्रश्न आहेत प्रत्येक निवडणुकीत हे देऊ ते देऊ असे सांगितले जाते प्रत्यक्षात काहीच मिळत नाही़ जनताही केवळ आश्वासन देणाऱ्यांनाच मते देते़ तेच ते चेहरे निवडून येतात़ त्यामुळे काहीच फरक पडत नाही़ तुमच्यासारखेच तुमचे आमदार आणि खासदार जशी राजा तशी प्रजा की जशी प्रजा तसा राजा हे काही मला कळत नाही असे सांगत ठाकरे म्हणाले़ आतापर्यंत महाराष्ट्रातील साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी अजित पवार काय बोलतात? असा सवाल त्यांनी केला़ बदल घडवायचा नसेल तर मग निवडणुका कशासाठी आणि ही स्टंटबाजी कशासाठी़ राज्यात नवीन बाबी साकारण्याचे मी स्वप्न पाहिले असून, एक वेगळा प्रयोग करण्यासाठी मी तयार आहे तुमची साथ मिळाली तर ते शक्य होईल अशक्य असे काहीच नाही. मला प्रॉपर्टी कमवायची नाही,कारखाने काढायचे नाही, राजकीय अड्डे तयार करण्यासाठी काही करायचे नाही़ ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे वळत आहे़ त्यांना मात्र नोकऱ्या मिळत नाही़ राज्यातील शेतजमीन युरोपसारखी आहे़ परंतु त्याचा काही उपयोग नाही़ शेतकरी आत्महत्या करतात याला सत्ताधारी जबाबदार आहेत़ (तालुका प्रतिनिधी)