दिव्यांगांना प्राध्यान्याने मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:33+5:302021-03-09T04:24:33+5:30

शेवगाव : दिव्यांगांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने विविध साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिव्यांगांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात ...

Give free corona vaccine to the disabled! | दिव्यांगांना प्राध्यान्याने मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्या!

दिव्यांगांना प्राध्यान्याने मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्या!

शेवगाव : दिव्यांगांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने विविध साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिव्यांगांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी, या मागणीचे निवेदन सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने तहसीलदार अर्चना पागिरे यांना देण्यात आले.

यावेळी सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख, सचिव नवनाथ औटी, उपाध्यक्ष संभाजी गुठे, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, संघटक खलील शेख, सहसंघटक अनिल विघ्ने, शहर अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनील वाळके, महिला सचिव सकुताई मिसाळ आदी उपस्थित होते.

दिव्यांगांना कोणत्याही साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. वैश्विक महामारी काळात दिव्यांगांना संघटनेच्यावतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपआपली काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने दिव्यांग बांधव कोरोनापासून दूर राहिले आहेत; परंतु सध्याची परिस्थिती पाहता अनेक जण कोरोना काळातील नियम पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दिव्यांगांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Give free corona vaccine to the disabled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.