शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनीच रचला अपहरणाचा बनाव

By admin | Updated: September 21, 2014 23:48 IST

अकोले : ‘आपले अपहरण झाले होते’ असा बनाव रचणाऱ्या मुलींनीच अपहरण झाले नाही अशी कबुली दिल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

अकोले : ‘आपले अपहरण झाले होते’ असा बनाव रचणाऱ्या मुलींनीच अपहरण झाले नाही अशी कबुली दिल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी केले. शनिवारी रात्री गर्दणीच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीने आपले व आपल्या सहावीत शिकणाऱ्या मामेबहिणीचे अपहरण झाले, प्रसंगावधान साधून आम्ही पळालो, अशी फिर्याद दिल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या मुली शुक्रवारी सकाळी शाळेत येत असताना रस्त्यात पिवळ्या जीपमधून आलेल्या काही जणांनी आपले अपहरण केले. आपणास गुंगीचे औषध दिले. सायंकाळी डोंगरगाव शिवारात आमची गुंगी उतरली असता अपहरणकर्त्यांची नजर चुकवून आपण सुटका करुन घेतली. तेथील लोकांच्या मदतीने घरी संपर्क साधला व मामाच्या मदतीने तक्रार दिली, अशी फिर्याद काल या मुलींनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी वेगात तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी जावून चौकशी केली. सहावीतील मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा अपहरण झालेच नाही ही बाब पुढे आली. दहावीत शिकणारी मुलगी मामाकडे राहत असून तिचे मूळ गाव सिन्नर आहे. आई-वडिलांची आठवण आल्यामुळे तिला सिन्नरला जायचे होते. ती व तिची मामे बहीण काल शाळेत न जाता थेट सिन्नरच्या दिशेने निघाल्या. सायंकाळी त्या डोंगरगाव शिवारात एका वस्तीवर पोहचल्या. परंतु अंधार पडल्याने पुढे जाणे शक्य नव्हते. घरी गेले तर जाब विचारला जाईल, या भीतीमुळे त्यांनी अपहरणाचा बनाव रचला. मात्र हा बनाव पोलिसांपुढे फार काळ टिकला नाही. रविवारी दिवसभर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या चर्चेने तालुका ढवळून निघाला.(तालुका प्रतिनिधी)