मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:26+5:302021-07-31T04:22:26+5:30
पीडिता घराजवळून जात असताना चेडगाव- ब्राह्मणी जाणाऱ्या रस्त्यावरून आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर तिला नगर तालुक्यातील केडगाव येथील रूमवर नेले. ...

मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीचे अपहरण
पीडिता घराजवळून जात असताना चेडगाव- ब्राह्मणी जाणाऱ्या रस्त्यावरून आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर तिला नगर तालुक्यातील केडगाव येथील रूमवर नेले. त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न आरोपीबरोबर लावून दिले नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीला मारहाण केली. दीड महिना रूममध्ये डांबून ठेवले. दरम्यान, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. आरोपींच्या ताब्यातून ती संधी साधून पळून आली. २९ जुलै रोजी राहुरी पोलीस ठाण्यात मुलीने धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र शंकर बर्डे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) त्याच्या सोबत असलेला अनिल, ज्योती या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रवींद्र शंकर बर्डे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.