घनश्याम शेलार यांचा सेनेला बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:47 IST2019-02-21T14:46:52+5:302019-02-21T14:47:17+5:30

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीगोंद्यात सेनेला खिंडार पडले आहे.

Ghanshyam Shelar's Senna Bye-Bye | घनश्याम शेलार यांचा सेनेला बाय-बाय

घनश्याम शेलार यांचा सेनेला बाय-बाय

श्रीगोंदा : शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीगोंद्यात सेनेला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका जाहीर केली. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार, शाहू शिपलकर, मोहन भिंताडे, प्रकाश निंभोरे यांच्या उपस्थित होते.
शेलार म्हणाले, सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. भाजपाच्या विरोधात सेनेचे मावळे मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना उध्दव ठाकरे यांनी भाजपाशी युती केली आणि युटर्न मारला आहे. त्यामुळे शिवसैनिक गहाळ झाले आहेत. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त शरद पवार यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रवादीत असताना पाचपुतेंशी तात्वीक मतभेद झाले पण त्यांनी चुका दुरूस्त करुन घेतल्या नाहीत. आमदार राहुल जगताप यांना त्याच्या चुका कळाल्या आहेत. पुढील निर्णय लवकरच सर्वांना सांगू असेही शेलार म्हणाले.

Web Title: Ghanshyam Shelar's Senna Bye-Bye