खडसेंचे समाधान झाले आहे-गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:09 IST2019-10-04T14:59:00+5:302019-10-04T15:09:28+5:30
भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

खडसेंचे समाधान झाले आहे-गिरीश महाजन
कर्जत : भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मुलीला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचे आता समाधान झाले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडा साफ होणार आहे. चाळीसच्या वर एकही आमदार त्यांचा विधानसभेत दिसणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
कर्जत येथे पालकमंत्री राम शिंदे यांचा शुक्रवारी शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी महाजन हे आले होते. पत्रकारांशी बोलताना महाजन पुढे म्हणाले, भाजपच्या पार्लंमेंटरी बोर्डात उमेदवारीबाबत निर्णय होत असतात. काही कारणामुळे बोर्डाने खडसे यांना उमेदवारी दिली नसेल. खडसे यांच्यावर आणखी काही वेगळी जबाबदारी देण्यात येऊ शकते. पक्षाने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांचे आता समाधान झाले आहे. पक्षात मानापनाचे नाट्य सुरूच असते. यामुळे बंडखोरीचे चित्र दोन कमी होईल. पुन्हा पक्षातील सर्व जण एकत्रितपणे काम करतील, असे ते म्हणाले.
मावळला राष्ट्रवादीचे नेते पवार यांची पिढी निवडणुकीत उतरली होती. त्यांना तेथे जनतेने उत्तर दिले आहे. अजित पवारांच्या नाराजी नाट्याच्या भूमिकेबद्दल काहीतरी वेगळे कारण आहे. लोकसभेला शरद पवार साहेबांना माघार घ्यावी लागली. याचे कारण तिसरी पिढी मागे हटायला तयार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
बारामतीचा पराभव करणार -राम शिंदे
यावेळी पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, शक्तीप्रदर्शनात कर्जत जामखेडमधून मी अर्ज भरला. भाजपचे खास दूत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे माझे अर्ज भरयला आले आहेत. यावेळी वरूण राजाने आम्हाला साथ दिली. आपण बारामतीचा निश्चित पराभव करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.