महसूलमंत्री थोरातांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:36+5:302021-02-06T04:37:36+5:30
मंत्री थोरात यांचा वाढदिवस ७ फेब्रुवारी हा संगमनेर तालुक्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गावोगावी ...

महसूलमंत्री थोरातांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा
मंत्री थोरात यांचा वाढदिवस ७ फेब्रुवारी हा संगमनेर तालुक्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गावोगावी महिलांसाठी तीळगूळ समारंभ, विविध स्पर्धांचे आयोजन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, काव्य मैफल असे विविध कार्यक्रम होणार आहे. याचबरोबर राज्यातही काँग्रेस कमिटीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस बळकटीकरण सप्ताह सुरू आहे. स्नेह मेळाव्यात शेतीविषयक व विविध विषयांवर चर्चा होणार आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांसह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.