भारत सर्व सेवा सघांची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:23+5:302021-07-02T04:15:23+5:30

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या ...

General Meeting of All India Service Associations | भारत सर्व सेवा सघांची सर्वसाधारण सभा

भारत सर्व सेवा सघांची सर्वसाधारण सभा

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी सकाळी पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गंगाधर चौधरी होते.

सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष आणि माजी आमदार दौलतराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर नांदे, सचिव सुनील सुतावणे, खजिनदार भिकाभाऊ शिंदे, माजी अध्यक्ष दतात्रय पाटील, रंगनाथ पवार, ओंकार तुवर, दादापाटील तुवर, विठ्ठल पवार, सुधाकर पवार, सुधाकर शिंदे, शिवाजी तुवर, गंगाधर देसाई, मच्छिंद्र पटारे, भागवत पवार, चिलिया तुवर आदींसह संस्थेचे सर्व सदस्य हजर होते.

Web Title: General Meeting of All India Service Associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.