गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:37+5:302021-03-20T04:18:37+5:30

आजी-माजी सैनिकांच्या माता, भगिनी, पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. पुढील काळात गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांची संघटना ...

Gathering of ex-servicemen at Gundegaon | गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांचा मेळावा

गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांचा मेळावा

आजी-माजी सैनिकांच्या माता, भगिनी, पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. पुढील काळात गुंडेगाव येथे आजी-माजी सैनिकांची संघटना स्थापन करण्यात येणार असून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. बचतगट स्थापन करून आजी-माजी सैनिकांना आर्थिक मदत केली जाईल, असे मत मेजर सतीश हराळ यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्यासमवेत चर्चा केली.

बैठकीस त्रिदल सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रवक्त्ता आठरे मेजर, श्रीगोंदा त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष संदीप सांगळे, कार्याध्यक्ष नितीन थोरात, नगर तालुका अध्यक्ष शरद पवार, नेवासा उपाध्यक्ष पोपट कापसे, मुरलीधर भापकर, सिद्धेश्वर हराळ, विठ्ठल माने, भवानी प्रसाद चुंबळकर, राहुल चौधरी, सोपन भापकर, झुंबर भापकर, संदीप कोतकर, मोहन कुताळ, संभाजी कुताळ, सतीश हराळ, श्यामराव कासार, संभाजी भापकर, दीपक माने, रामचंद्र हराळ उपस्थित होते.

Web Title: Gathering of ex-servicemen at Gundegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.