वर्षभरात गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:03+5:302021-07-16T04:16:03+5:30

----------------- सुदाम देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : वर्षभरात दोन ते तीन वेळा गॅस दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले ...

Gas cylinders increased by Rs 183 during the year | वर्षभरात गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी वाढले

वर्षभरात गॅस सिलिंडर १८३ रुपयांनी वाढले

-----------------

सुदाम देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : वर्षभरात दोन ते तीन वेळा गॅस दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यातही प्रत्येक गॅस सिलिंडरमागे मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद झाली आहे. नगर जिल्ह्यात वर्षभरात तब्बल १८३ रुपयांनी गॅस सिलिंडरची किंमत वाढली. तसेच १५३ ते २९१ रुपयांपर्यंत मिळणारे अनुदानही बंद झाले. त्यामुळे तीनशे ते चारशे रुपयांची झळ सोसावी लागत आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती जवळपास दर महिन्याला वाढविल्या आहेत. गत वर्षभराचा विचार केला तर गॅसच्या किमती १८३ रुपयांनी वाढल्याचे दिसते. २०१४ मध्ये गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल दुपटीने वाढल्या होत्या. सिलिंडरमागे मिळणारी सबसिडी गायब झाली आहे. यातून गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसिन काढून घेतले. आता केरोसिन नाही, अनुदान नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे.

---------------

शहरात चूलही पेटविता येत नाही

----------------

सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे. सामान्य माणसांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. दरवाढीमुळे दर महिन्याचे बजेट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत दोन पैसे वाचणे तर दूरच राहिले. उलट खर्च वाढला आहे. सरकारने महागाई नियंत्रित करावी.

- सविता नितीन लिगडे, गृहिणी

---------------

आता सिलिंडरची किंमत ८४८ रुपये झाली आहे. सहा वर्षांत सिलिंडरची किंमत दुपटीने वाढली आहे. सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून महिलांमध्ये संतापाची लाट आहे. शहरात राहत असल्याने फ्लॉटमध्ये चूलही पेटविता येत नाही. महिना-दोन महिने झाले की ५० ते १०० रुपयांनी वाढ होत असल्याने जगणेच कठीण होत चालले आहे.

- साधना विलास ठाणगे, गृहिणी

------------

जुलैमध्ये ५० रुपयाने वाढले दर

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढतच आहेत. आता जुलै महिन्यात नव्याने २५ रुपयांची भर पडली आहे. यामुळे ८६८ रुपयाला सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.

-------------

अशी झाली गॅस दरवाढ

महिना दर वाढलेली रक्कम

सप्टेंबर २०२० ६०७.५० ०.००

ऑक्टोबर २०२० ६०७.५० ०.००

नोव्हेंबर २०२० ६०७.५० ०.००

डिसेंबर २०२० ७०७.५० १००.००

जानेवारी २०२१ ७०७.५० ०.०००

फेब्रुवारी २०२१ ७८२.५० ७५.००

मार्च २०२१ ८३२.५० ५०.००

एप्रिल २०२१ ८२२.५० -१०.००

मे २०२१ ८२२.५० ०.००

जून २०२१ ८२२.५० ०.००

जुलै २०२१ ८४८.५० २६.००

--------------------

Web Title: Gas cylinders increased by Rs 183 during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.