शिवसेना बसविणार रस्त्यावर गणपती : अनिल राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:36 IST2018-09-04T13:36:42+5:302018-09-04T13:36:58+5:30
गणपती उत्सव साजरे करावेत की नाही, अशी मानसिकता नगर मधील गणपती मंडळांची झाली आहे. आमच्या सणांवार अन्याय खपवून घेतला जाणार नाही.

शिवसेना बसविणार रस्त्यावर गणपती : अनिल राठोड
अहमदनगर : गणपती उत्सव साजरे करावेत की नाही, अशी मानसिकता नगर मधील गणपती मंडळांची झाली आहे. आमच्या सणांवार अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अहमदनगर शहरात शिवसेना गणपती रस्त्यावरच बसवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केली.
सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेताजी सुभाष चौकातील शिवसेनेचा मंडप जमीनदोस्त केला. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने पत्रकार परिषदेत भुमिका जाहीर केली.
अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे यांच्यावर कडक कारवाई व्हावी. मंडप पाडल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेण्यात यावी. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यत शिवसेना मागे हटणार नाही. गणपती रस्त्यावरच बसविले जाणार आहेत, असे शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी सांगितले.
मंडपाच्या सर्व अटी किचकट आहेत. नगर शहरात रस्ते लहान आहेत, तरीही सर्व गणेश मंडळे सर्व बाबी तपासून गणपती बसवतात. काल झालेली कारवाई जाणून बुजून केलेली आहे. संभाजी कदम यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शहरातील मंडपाबाबत चर्चा केली होती. मात्र त्यांनी कारवाई का केली हे समजलं नाही. आमच्या सणावार अन्याय झाला तर खपवून घेतले जाणार नाही. गणपती रस्त्यावरच बसविले जाणार आहेत. कोणीही मंडपाची परवानगी घेऊ नये, प्रशासनाने जागेवर येऊन परवानगी द्यावी, असे अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.