मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 17, 2023 13:26 IST2023-10-17T13:25:50+5:302023-10-17T13:26:48+5:30

तीन जणांना अटक

Gang who broke donation boxes in temple jailed; Thieves at three places revealed | मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड

मंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद; तीन ठिकाणच्या चोऱ्या उघड

कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील विविध ठिकाणच्या मंदिरांतील दानपेट्या फोडणारी टोळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केली. तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिर, तळेगाव मळे येथील शनैश्वर मंदिर व मायगाव देवी येथील रेणुका माता मंदिरातील दानपेट्या काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम चोरून नेली होती. तीनही ठिकाणच्या चोरीबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरट्यांचा शोध कोपरगाव तालुका पोलिस घेत होते.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून धनंजय प्रकाश काळे (वय २५, रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव), भगवान दिलीप परदेशी (वय ३६, रा. शिर्डी, ता. राहाता) व राहुल केवलसिंग लोदवाल (वय ३२, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिरातून चोरलेली ७ हजार ५०० रूपयांची रोख रक्कम काढुन दिली आहे. या शिवाय तळेगाव तळे व मायगाव देवी येथील मंदिरातून चोरलेले १९ हजार ५०० रूपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पो.हे.कॉ. संदीप बोटे, पो. ना. संतोष लांडे, पो.कॉ. अनिश शेख, पो. कॉ. अंबादास वाघ, पो. कॉ. राघव कोतकर, पो. कॉ. रमेश झडे, पो. कॉ. अमोल फटांगरे, चालक पो. ना. रामा साळुंके यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Gang who broke donation boxes in temple jailed; Thieves at three places revealed