महामार्गावर पैसे लुटणा-यांची टोळी नगर पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:10 IST2018-01-22T14:10:06+5:302018-01-22T14:10:23+5:30
महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महामार्गावर पैसे लुटणा-यांची टोळी नगर पोलिसांनी पकडली
अहमदनगर : महामार्गावर व्यापा-यांचे पैसे लुटणारी पाच जणांची टोळी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पोलीसांनी पकडलेले हे पाच जण हवाला रॅकेटचे पैसे चोरत असल्याची माहिती समोर आहे. पोलीस या टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी नगर-औरंगाबाद रोडवरील संगमनेर येथील व्यापा-याचे याच टोळीने दहा लाख रूपये चोरले होते. कारच्या काचा फोडून वाहनचालकांना दमदाटी करत हे पैसे चोरण्यात आले होते. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना हवाला रॅकेट समोर असल्याचे समजते. पथकाने सकाळी सात पासून शहरात विविध ठिकाणाहून पाच आरोपींना अटक केली आहे. यातील चार जण हे केडगाव येथील असल्याचे समजते. पैसे लुटण्यासाठी केडगाव येथील राजकीय पक्षाच्या पदाधिका-याचे वाहन वापरत असल्याचे समोर आले आहे. या लुटारूंच्या टोळीने अनेकांचे पैसे अशाच पद्धतीने लुटले आहेत. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आलेले असल्याने पकडलेल्या चोरट्यांचे नावे पोलीसांनी अद्यापपर्यंत उघड केलेले नाहीत.