घोड नदीच्या काठावर वाळू तस्करीवरून टोळीयुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:13+5:302021-09-05T04:25:13+5:30
या प्रकरणी चेतन ऊर्फ स्वराज काळूराम कदम, सागर विनोद ससाणे (रा. देवदैठण), अक्षय सोनवणे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) या ...

घोड नदीच्या काठावर वाळू तस्करीवरून टोळीयुद्ध
या प्रकरणी चेतन ऊर्फ स्वराज काळूराम कदम, सागर विनोद ससाणे (रा. देवदैठण), अक्षय सोनवणे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) या आरोपींच्या विरोधात बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूरमध्ये वाळू तस्करीवरून वाद धुमसत आहे. पोलीस पाटील ढवळे यांनी काहींची पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. या वादातून ढवळे यांना काठी, गजाने मारहाण झाली. आमच्या विरोधात बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवितो का? आता तुझ्या विरोधात जातिवाचक शिवीगाळचा गुन्हा दाखल करतो, असे सांगून एमएच १६, बीएम ६०६५ या नंबरच्या स्कॉर्पिओमध्ये जबरदस्तीने बसविले व मारहाण करून चिंभळे शिवारात सोडून दिले. त्यानंतर आरोपी श्रीगोंद्याच्या दिशेने निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस काॅन्स्टेबल डी. आर. पठारे करीत आहेत.