तीन गुंडांची टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 16:52 IST2020-07-15T16:51:58+5:302020-07-15T16:52:48+5:30
संघटितपणे हल्ले करून दहशत निर्माण करणाºया कोतूळ (ता.अकोले) येथील तिघा गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

तीन गुंडांची टोळी नगर जिल्ह्यातून हद्दपार
अहमदनगर: संघटितपणे हल्ले करून दहशत निर्माण करणा-या कोतूळ (ता.अकोले) येथील तिघा गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दीड वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
मोहन सखाराम खरात (वय २६), गुलाब भिकाजी खरात (वय ३८) व अमोल भिकाजी खरात (वय ३०, रा.तिघे कोतूळ ता.अकोले) अशी हद्दपार केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघा गुंडांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात लोकांना मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दुखापत करणे, दगडफेक करून दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या तिघा विरोधात अकोले पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या तिघा गुंडांना नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी तालुका, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून १४ जुलेपासून हद्दपार करण्यात आले आहे.