दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली
By Admin | Updated: June 27, 2023 13:34 IST2014-09-06T23:55:57+5:302023-06-27T13:34:47+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात शुक्रवारी पहाटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६जणांच्या टोळीला गस्ती पोलिसांनी पकडले.

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात शुक्रवारी पहाटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६जणांच्या टोळीला गस्ती पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून पोलिसांनी २ मोटारसायकली (एमएच१७ ए.पी. ८४६३ व एम.एच. १७ ए.एल. २११३), मिरची पूड, लोखंडी कोयता, हॉकीस्टीक, लाकडी दांडके, नॉयलॉन दोरी आदी साहित्य जप्त केले. चोर वडाळा महादेव व शिरसगाव परिसरातले आहेत.
पोलीस निरीक्षक सुरेशराव सपकाळे, सुधीर पाटील, पाळदे, पोलीस नाईक वेठेकर, हबीब शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दत्तात्रय उर्फ हेमंत किसन शेळके, बाळू नंदू पवार, अनिल नंदू पवार (तिघे रा. शिरसगांव), संतोष ज्ञानेश्वर पवार (रा. ब्राम्हणगांव वेताळ), बादशाह उर्फ भोला शब्बीर शेख (रा. अशोकनगर), जितेंद्र काळे, योगेश (पूर्ण नाव नाही) (रा. वडाळा महादेव) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.