मोरोक्कोत भारतीयांचा गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:09+5:302021-09-12T04:26:09+5:30
मूळचे श्रीरामपूरचे प्रकाश आणि रचना फासाटे हे कुटुंब गेल्या ११ वर्षांपासून मोरोक्को देशात वास्तव्यास आहे. हे कुटुंब दर वर्षी ...

मोरोक्कोत भारतीयांचा गणेशोत्सव
मूळचे श्रीरामपूरचे प्रकाश आणि रचना फासाटे हे कुटुंब गेल्या ११ वर्षांपासून मोरोक्को देशात वास्तव्यास आहे. हे कुटुंब दर वर्षी घरीच इको फ्रेंडली गणपती बनवून त्याची प्रतिष्ठापना करते. रचना फासाटे या योग शिक्षिका आहेत. त्यांनी यंदा गणपतीसमोर ‘गावाकडे चला’ असा देखावा तयार करून त्यात शेती, पिके, विहीर, शेतकऱ्याचे घर, गोठा, जनावरे, बैलगाडी असे भारतीय शेतकऱ्याचे जीवन साकारले आहे. हा देखावा तयार करताना गावातील कित्येक प्रसंगाची, बालपणीची आठवण ताजी झाली, असे ते सांगतात. दहा दिवसांत आमच्याकडील गणपती सजावट बघण्यासाठी आमचे दूरवरचे मित्र अगदी पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आवर्जून येतात. या आमच्या संपूर्ण सजावटीमध्ये आम्हाला भारतीय मित्र नंदकुमार सुतार, प्रमोद शिंदे, स्नेहल शिंदे, विठ्ठल पाटील यांची मदत झाली, असे फासाटे यांनी सांगितले.
-----------
फोटो - ११मोरोक्को गणपती
मूळचे श्रीरामपूरमधील व सध्या युरोपजवळील मोरोक्को देशात स्थायिक असलेल्या फासाटे कुटुंबीयांनी घरी गणेशाची प्रतिष्ठापना करून शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित ‘गावाकडे चला’ हा देखावा साकारला आहे.