कोतुळात गर्दीचा गणेशोत्सव झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:57+5:302021-09-12T04:24:57+5:30
कोतूळ येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीत शहरातील श्रीकृष्ण, नागेश्वर, समता, खटपट नाका, अण्णा भाऊ साठे, सावता महाराज, देवी ...

कोतुळात गर्दीचा गणेशोत्सव झाला बंद
कोतूळ येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीत शहरातील श्रीकृष्ण, नागेश्वर, समता, खटपट नाका, अण्णा भाऊ साठे, सावता महाराज, देवी गल्ली, गोरोबा काका, भाऊ दाजी देशमुख, सेना महाराज या नावाजलेल्या मंडळांनी यावर्षी छोटी मूर्ती खासगीत स्थापन करून फक्त मंडळाचे सदस्य आरती करतील, असा ठराव संमत करून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. कोतूळ शहरात बारा मोठी मंडळे असून गेल्या चाळीस वर्षांपासून हलते व जिवंत सामाजिक देखावे सर्वदूर प्रसिद्ध होते. हे देखावे पाहण्यासाठी रात्री एकपर्यंत मोठी गर्दी असायची. मात्र यंदा शांतता समितीच्या बैठकीत गर्दी टाळण्यासाठी देखावे, मोठी सजावट करणे टाळले.
यावेळी सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, सदस्य राजेंद्र देशमुख, हेमंत देशमुख, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील साळवे, चंद्रकांत घाटकर, धनंजय देशमुख, योगेश देशमुख, विकास देशमुख, प्रकाश वाकचौरे, विजय काळे, सुनील आरोटे, शगीर काजी, एजाज शेख, अन्सार पठाण, शिवाजी पवार, ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव उपस्थित होते.
..............
कोतूळ येथील सर्व गणेश मंडळांनी लहान मूर्ती स्थापन करून गर्दी, गोंगाट टाळण्याचे आश्वासन पाळले. गणेशोत्सव संपताच सर्वांचा सन्मान करू. डीजे वाजवला तर गुन्हे दाखल होतील. कोतूळ शहरातील बेशिस्त पार्किंगवर लवकरच कारवाई केली जाईल.
-मिथुन घुगे, पोलीस निरीक्षक
................
कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी नको, सामाजिक बांधिलकी हाच गणेशोत्सवाचा हेतू आहे. सर्व मंडळांचा एकमुखी निर्णय ही एकोप्याची पावती आहे, प्रशासनाला सहकार्य करू.
-संदीप घाटकर, समता मंडळ
110921\img_20210907_111510.jpg
कोतूळ गणेशोत्सव शांतता समिती बैठक फोटो