नगर तालुक्यात उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:13+5:302021-09-12T04:26:13+5:30
केडगाव : मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राज्य आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर ...

नगर तालुक्यात उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा स्पर्धा
केडगाव : मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी राज्य आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
तहसीलदार पाटील म्हणाले, नगर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा. तसेच गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात येते की, मताधिकार जागृतीविषयीचे व्हिडिओ क्लिप्स, घोषवाक्य, मंडपाच्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याविषयी जनजागृती करणारे बॅनर लावणे, तसेच स्पर्धेमध्ये मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ, लिंग, निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयांवर अल्पशा सजावटीतून जनजागृती करणे हा या निवडणुका विभागाचा व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा आहे. ही स्पर्धा १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात होणार आहे.