वृक्षाला गणेशाचा साज ; वनविभागाचा पर्यावरण संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 14:22 IST2017-08-28T14:22:01+5:302017-08-28T14:22:17+5:30
पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एका झाडाला गणेशाच्या रूपात साज करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे.

वृक्षाला गणेशाचा साज ; वनविभागाचा पर्यावरण संदेश
ल कमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एका झाडाला गणेशाच्या रूपात साज करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे. यातून वनविभागाने वृक्ष लागवड व पर्यावरण संतुलन हा संदेश गणेश भक्तांना दिला आहे. कर्जत तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सवात कर्जत तालुक्यातील चिलवडी, तरडगाव, बेरडी, थेटेवाडी, पाटेगाव या पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. कर्जत तालुक्यातील सर्व गावात वाड्यावस्त्यावर गणपती बसविण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील फक्त ५१ गणेश मंडळांनी अधिकृत परवाने काढले आहेत. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या सिध्दटेक येथे गणेश भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. यावर्षी अनेक वर्षानंतर गणपतीत पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. कर्जत येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यात वृक्षारोपण करण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल नशिफखान सिंघल यांनी हे अभियान राबविले आहे. कर्जत तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये, न्यायालयाचा परिसर, वनजमिनी, शासकीय कार्यालयाचा परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल नशिफखान सिंघल यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे एका झाडाची सजावट करण्यात आली होती. यामधून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन याचा संदेश देण्यात आला आहे. सजावट केलेले हे झाड पहाण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे. वृक्षलागवड करण्याचा संकल्प करूनच गणेश भक्त येथून बाहेर पडत आहेत. ..