गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:49+5:302021-09-12T04:25:49+5:30
चिचोंडी पाटील : सार्वजनिक गणेश उत्सवासाठी जमा झालेल्या देणगीच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा पुस्तक संच भेट देणे, रक्तदान ...

गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा
चिचोंडी पाटील : सार्वजनिक गणेश उत्सवासाठी जमा झालेल्या देणगीच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा पुस्तक संच भेट देणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे यांसारखे विधायक कार्य राबवावे. गणेश मंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.
चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर गणेश उत्सवाबाबत विचार विनिमय करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, दीपक हजारे, ज्ञानेश्वर ठोंबरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ॲड. अमित बोरा, अंबादास कोकाटे, सचिन खडके, शरद कोकाटे, विष्णू भद्रे, राजू तनपुरे, विजय गाडे आदींसह गावातील विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
100921\1630screenshot_20210910-131109_gallery.jpg
चिचोंडी पाटील : गणेश उत्सवाच्या पाश्वभूमिवर नार तालुका पोलिसांनी सपोनि राजेंद्र सानप यांच्या मागदर्शन त पथ संचलन केले . (छाया: संजय ठोंबरे )